About Vichakshan


मुळ संकल्पना

‘विचक्षण’ हा संस्कृत भाषेतील शब्द आहे, तंज्ज्ञाकडून ज्ञानकण गोळा करुन ते ज्ञानपिपासूंसाठी मांडणे असा त्याचा अर्थ होतो. वाचन चळवळ अधिक समृध्द व्हावी या दृष्टीने विचक्षण संस्था गेल्या दशकापासून प्रकाशन क्षेत्रात कार्यरत आहे. या प्रवासात बदलत्या काळानुसार विचक्षणने नवनवीन बदल स्विकारले आहे. संस्था विचक्षण एक नयी सोच… या नावाने डिजिटल मीडिया क्षेत्रातही कार्यरत आहे. याच डिजिटल मीडियाचा आधार घेत संस्थेने एका नव्या पत्रकारितेला सुरुवात करण्याचे ठरवले आहे. समाजात प्रबोधनाचे कार्य हे अनेक प्रकारे सुरु आहे. मात्र वाचनाने हे प्रबोधन अधिक सुखकर होईल, म्हणून ‘विचक्षण एक नई सोच…’ हे डिजीटल ॲप आणि वेबसाईट संस्थेने सुरु केली आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हा स्तंभ अधिकाधिक बळकट करण्यासाठी विचक्षणने देखील खारीचा वाटा उचलण्याचा निर्धार केला आहे.

उद्दिष्टे

माध्यमे समाज मनाचा आरसा असतात. लोकशाहीच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने माध्यमांची भूमिका मोलाची ठरते. समाजातील चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी, घटना, माहिती तथा बातम्या समोर आणण्यासाठी अशाच एका बेधडक माध्यमाची आवश्यकता लक्षात घेत आम्ही विचक्षण एक नई सोच… हे मोबाईल न्यूज ॲप सुरु केले. बातमीबरोबरच ज्ञानवृध्दी व्हावी हा यामागील आमचा मुख् उद्देश आहे. त्यामुळे नुसती बातमी न देता, त्या बातमीच्या मुळाशी जाऊन व पाठपुरावा करुन विषयाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. केवळ बातमी न देता, बातमी मागची बातमी देण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर लोकांना विविध विषयांची माहिती व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी या दृष्टीने विविध विषयांवरील लेख आम्ही विचक्षण च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत होतो आणि यापूढे देखील पोहचवणार आहोत. नव्या युगाचा नवा पत्रकार घडवावा जेणेकरुन इतिहासातील आदर्शवत पत्रकारिता समाजाला पुन्हा जाणवेल हाच मुख्य उद्देश समोर ठेवुन ‘विचक्षण एक नई सोच’ कार्य करणार आहे. आमचे हे माध्यम संपूर्णत: सामान्य जनतेला समर्पित असेल.

परिणाम

विचक्षण केवळ बातमी नाही तर दणकाही देतो, आणि तोही पुराव्यांसह… रोजच्या त्याच त्याच बातम्यांपेक्षा ज्ञानात भर आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या बातम्या देण्यास आमचे प्राधान्य असेल. आमची बातमी सरकारचं डोक ठिकाणावर आणेल, जनतेच्या समस्यांना वाचाही फोडेल. आमच्या संस्थेची बातमी खोटेपणा आणि खरेपणा यातील फरक स्पष्ट करेल. विविध लेख, माहिती वाचकांच्या ज्ञानात भर घालण्याचे काम करेल. ‘सरकारी काम चार महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय सामान्य नागरीकांना शासकीय कार्यालयांमध्ये येत असतो. पण विचक्षण यावर आपल्या ॲपच्या माध्यमातून शासनाच्या गैरप्रकारांना जनतेसमोर आणेल. आदिवासींच्या समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, भ्रष्टाचार असो किंवा सामान्य जनतेची हाक, समाजातील एखादी सकारात्मक बाब, विचक्षण प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करेल.