सांगा आम्ही शाळेत कसे जायचे; सवलत पास अभावी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची फरपट
मुळशीत होणाऱ्या अपघाताला दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मनसेतर्फे तहसीलदारांना निवेदन
शिवसेना तर्फे मुळशी मध्ये दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार
जप्त केलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून चोरट्यानी पळविला
अनिल गोटे यांच्यावर प्रसिद्ध पत्रकातून भाजपा युवा मोर्चाची गंभीर टीका
कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्ग लगत असलेल्या नांदगाव असलदे शिवाजी नगर येथील भले मोठे वडाचे झाड पावसामुळे उन्मळून पडले. हा वटवृक्ष विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईन वर कोसळल्याने पोल सहीत विद्युत तारा तुटून पडल्या आहेत. यावेळी सुदैवाने वाहन अथवा पादचारी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हा वृक्ष बुधवारी सकाळी ६.४५ वा. कोसळला. यामुळे काही काळ देवगड निपाणी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
तातडीने असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी विज वितरण कंपनीचे अधिकारी श्री. पंडित यांना दुरध्वनी व्दारे संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ लाईनमन यांना पाठवून विद्युत पुरवठा बंद केला व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.
यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या सहीत सिमरन कांदळकर, सचिन कांदळकर, श्रीकृष्ण वायंगणकर, सतिश पोकळे, मनोहर प्रभूखोत, भाग्यश्री नरे, यासीर मास्के, गवस ताबोंळी आदींनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली आहे.
सातारा: सातारा जिल्ह्यातील व खटाव तालुक्यातील प्रसिध्द असणारे स्थान म्हणजे गोंदवले होय. महाराष्ट्राला फार मोठी संतांची परंपरा लाभली आहे. संत रामदास, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशा संतांनी जीवनातील अनेक गोष्टींचे ज्ञान समाजाला दिले. तसेच गोंदवले येथील रामाचे भक्त संत ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची गोंदवले येथे समाधी आहे. दर पौर्णिमेला व इतर वेळी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. दि. ५ रोजी गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिरातून दिंडी पंढपूर कडे गेली आहे. त्या नंतरच ६ जुलै पासून पारायण सुरु होत आहे. या ठिकाणी पहारा बसत असतो यामध्ये प्रत्येकाने नाम जप करायचा असतो. हा पहारा गुरू पौर्णिमेपर्यंत अखंड चालतो. पारायण गुरूपौर्णिमेपर्यंत चालते. आधिक माहिती अशी की, संत गोंदवलेकर महाराजांचे सर्व जगात भक्त आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर येथील देखील भाविक गोंदवल्यात महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे खूप गर्दी असते. महाप्रसादाला तर येथे एका वेळी पाचशे भाविक बसू शकतात अशी व्यवस्था देवस्थान ट्रस्ट ने केली आहे. भाविकांसाठी स्नानास गरम पाण्याची सोय देखील उपलब्ध आहे. येथील ट्रस्ट तर्फे भाविकांची व्यवस्था करण्यात येते. ह्या वेळची गुरूपौर्णिमा ही १३ जुलै रोजी आहे. भजने किर्तने देखील या प्रसंगी समाधी मंदिरात होत असतात.
शाहूवाडी: रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर, करेवाडी गावाजवळ उड्डाणपुलावरून संत बाळूमामा आषाढी पायी वारकरी दिंडी तालुका शाहुवाडी, कापशी या गावातील लोक जात असताना, दिंडीमध्ये चार चाकी गाडी घुसल्याने साधारणतः 25 वारकरी जखमी झाल्याची घटना सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली. यावेळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरची आषाढी एकादशी रविवारी असल्याने, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यातील अनेक वारकरी, पायी दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जात असतात.
त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातील सद्गुरू संत बाळूमामा आषाढी पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने जात होती. दिंडी करेवाडीतील गावाजवळील उड्डाणपुलावर जात होती, दिंडीच्या पाठीमागे रथ होता. प्रत्येक वर्षी नागजाच्या हायस्कूल मध्ये दिंडीचा मुक्काम असतो. मुक्कामाचे ठिकाण अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असताना, मिरजहून पंढरपूरच्या दिशेने चार चाकी पिकप, गाडी क्रमांक एम.एच. ०८ डब्ल्यू 5711 वेगाने जात होती. त्यावेळी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने प्रथम रथाला धडक दिली व पायी चाललेल्या दिंडीत घुसून पलटी झाली. त्यानंतर जखमींना प्रथम कवठेमहाकाळच्या उपजिल्हा रुग्णालय व नंतर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुळशी: प्रामाणिकपणा हा एक गुण आहे, जो माणसाची नैतिकता दर्शवतो. जर सर्व लोकांनी प्रामाणिकपणे आचरण केले तर समाज खर्या अर्थाने आदर्श समाज होईल आणि भ्रष्टाचार व सर्व दुष्कृत्यांपासून मुक्त होईल. तालुका मुळशी, जिल्हा पुणे मुळशी तालुक्यात घोटावडे फाटा हा एकमेव असा चौक आहे जो हिंजवडी पुणे लावासा कोकण सगळ्या मार्गांना जोडणारा रस्ता आहे. तेथे कार्यरत असणारे श्री जालिंदर सर्जेराव तापकीर नेहमीप्रमाणे घोटवडे फाट्यात कार्य बजावत असताना त्यांना पैशाने भरलेली पाकीट सुमारे सकाळी नऊच्या दरम्यान सापडले. त्यांनी लगेच वरिष्ठांना सूचित करून याची माहिती दिली. अकबर शब्बीर इनामदार रा. कराड, ता. कराड, जि. सातारा यांचे 25000/- रु. रोख रक्कमेसह महत्वाची कार्ड असणारे पाकीट हरवले होते. घोटावडे फाटा ट्रॅफिक वाॅर्डन म्हणुन काम करणारे अत्यंत प्रामाणिक कर्मचारी जालिंदर सर्जेराव तापकीर यांना सापडले. पाकिटातील माहितीवरून शिरीष गुंजाळ यांनी अकबर इनामदार यांचेशी संपर्क साधून त्याचे हरवलेले पाकीट सर्व रकमेसह परत करण्यात आले. जालिंदर तापकीर यांचे प्रामाणिकपणाबद्दल पिरंगुट बीट चौकीचे सपोनि रमेश गायकवाड, सहाय्यक फौजदार संतोष कुंभार, पोलीस हवालदार श्रीनिवास जगदाळे यांनी कौतुक केले. प्रामाणिक आहेत हे नेहमी ऐकायला भेटत होते. प्रत्यक्षात आज यांनी दाखवून दिले की, श्री जालिंदर सर्जेराव तापकीर की हे प्रामाणिक आहेत. ह्यांचे कौतुक अख्ख्या शिंदेवाडी घोटावडे फाटा पिरंगुट या परिसरात होत आहे. आपण यांचे कौतुक करेल तेवढे कमी. जे आपलं नसतं त्याच्यावर कधीच आपलेपणा दाखवू नये. यांनी या पैशाच्या भरलेला पाकीट सापडल्यानंतर कुठले मोह न दाखवता ह्यांनी आज सिद्ध करून दाखवले जे आपले आहे त्याच्यावरच आपला अधिकार आहे. दुसऱ्याच्या कितीही मौल्यवान वस्तूवर आपला अधिकार नसतो. पैशाने भरलेले पाकीट त्यांनी परत केले.
अकोला बाजार: धानोरा शेत शिवारात गत 18-20 दिवसापासुन वाघाने दहशत माजविली आहे, त्यामुळे धानोरा शेत शिवारात रात्रीच्या वेळी पिकांच्या संरक्षणासाठी जात असलेले शेतकरी आता आपल्याच शेतात जाण्यासाठी घाबरत आहे. धानोरा येथील काही शेतकर्यांच्या माहितीनुसार वाघ हा 8-10 km अंतराच्या आसपास भटकत राहतो, आणि त्यात त्या वाघाच्या तोंडाला रक्त लागल्याने तो वाघ या धानोरा शिवारातच फिरतो आहे. मागील 15 दिवसापूर्वी त्या नर भक्षक वाघाने आधी एका नीलगायची शिकार केली. तेच 8 दिवसानंतर 27 जून ला पुन्हा एका जंगली रानडुकराची शिकार केली होती. त्यामुळे शेतकरी व शेत मजूर कमालीचे भयभीत झाले आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी व शेत मजूर दिवसभर शेतात काम करीत असतात. अश्यावेळी नकळत वाघाने हल्ला केला तर एखाद्याचा बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वन विभागाने या नर भक्षक वाघाचा निष्पाप शेतकरी आणि शेत मजूरांचा बळी जाण्यापूर्वी बंदोबस्त करावा अशी मागणी धानोरा व वडगाव येथील शेतकरी करीत आहे. अशी माहिती आज दिनांक 05-07-2022 ला मिळाली आहे.
सांगा आम्ही शाळेत कसे जायचे; सवलत पास अभावी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची फरपट
मुळशीत होणाऱ्या अपघाताला दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मनसेतर्फे तहसीलदारांना निवेदन
शिवसेना तर्फे मुळशी मध्ये दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार
जप्त केलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून चोरट्यानी पळविला
अनिल गोटे यांच्यावर प्रसिद्ध पत्रकातून भाजपा युवा मोर्चाची गंभीर टीका
पिंपळवाडीत युवकाचा खून ! मित्रांनीच काढला काटा ?
डिसले गुरूजींचे धक्कादायक सत्य आले समोर
शिष्यवृत्तीसाठी आता अखेरचे ३ दिवस ३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत
एस.टी.विना बारावी परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांचे हाल
नगर शहरातील अजब रस्त्यांची गजब गोष्ट !