शॉर्टस

समाजकारणात पक्के मुरलेले लोकनेते गणेश मोहिते
Latest News
news img

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा सोनपेठ शाखेचा अनोखा उपक्रम

news img

शिष्यवृत्ती थकविल्याने ठाणे जिल्ह्यातील शालेय शिक्षण संस्था अडचणीत

news img

केतकी चितळेच्या पोस्टवर सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

news img

धारदार शस्त्राने भोसकून पारवा येथे युवकाचा खून

news img

मध्यप्रदेश भाजपाची भोपाळमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; पंकजाताई मुंडेंची उपस्थिती

...
समाजकारणात पक्के मुरलेले लोकनेते गणेश मोहिते

राजकारण, निवडणूका ते सन्माननीय लोकप्रतिनिधी हा अतिशय अवघड असणारा प्रवास मतदार आणि गोरगरिबांशी जोडले गेल्यामुळे अगदी सहजपणे पार करणारे पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष गणेश मोहिते यांच्याशी विचक्षणचे प्रतिनीधी यांनी आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर केलेली खास बातचीत....

२०१२ मध्ये राजकारणात सक्रिय
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांना सामावून घेणारी आहे. राजकारण आणि समाजकारणाचा योग्य समतोल राखून समाजकारणावर अधिक भर देत लोकांशी आणि आपल्या भावी मतदारांशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करत आलो आहोत.

दुर्गामाता नवरात्री उत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून जनमानसाशी नाळ जोडली गेली. यानंतर आपल्या मतदारसंघातील लोकांच्या सुख दु:खाच्या प्रसंगी सहभागी होऊन प्रत्येक सण,उत्सव एकत्रितपणे साजरे करायला सुरुवात केली.  हा केवळ प्रभाग नव्हे तर माझे कुटूंबच आहे या भावनेने त्यांच्यातलाच एक होऊन गेलो.

राजकीय प्रवासात पत्नीचीही खंबीर साथ
आजपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. राजकारणात सहकुटूंब सहभागी झालो. यादरम्यान, प्रभाग क्रमांक ३८ मधून मनिषा गणेश मोहिते यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली. आणि मतदारांनीही आमच्यावर विश्वास टाकून भरघोस मतदान केले. निवडणूकीत अगदी थोड्याशा फरकाने पराभव झाला असलो तरी मतदारांचे प्रेम पाहून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो.

कोरोनाकाळात एक आधारस्तंभ
कोरोनाचा काळ आपल्यातल्या प्रत्येकासाठी अतिशय खडतर होता. अचानक आलेले वैद्यकीय संकट आणि त्यावर मात करण्यासाठी शासनाने दिलेली मदतीची हाक अशी परिस्थिती होती. लॉकडाऊन मुळे बाहेर पडणेही शक्य नसताना सगळ्याचा सारासार विचार करुन एक पूर्वनियोजित धार्मिक कार्यक्रमाचे रक्तदान शिबीरात रुपांतर केले. आणि सर्व सामान्यांना तसेच कार्यकर्त्यांना केलेल्या एका  आवाहनामुळे लॉकडाऊनच्या काळात १२१ बाटल्या रक्ताचा मोठा साठा उभा करण्यात यशस्वी झालो.

Read more...
आरंभ :समाजकारणाच्या वारशातून तळागाळापर्यंत काम करण्याची शिकवण मिळाली : नगरसेवक बाळा ओसवाल

समाजातील विविध दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजकारणाचा आवड आणि त्यांच्या कल्याणासाठी राजकीय पाठबळाची गरज असते. ह्या दोन्हींची सांगड घालून समाजाचा विकास साध्य करता येऊ शकतो. पुण्यातील पर्वती मतदार संघातील माननीय आमदार शिवसेना आमदार बाळा ओसवाल यांच्याशी विचक्षण प्रतिनिधी संवाद साधत त्यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला.

सातत्याने १५ वर्षे राजकीय माध्यमातून आपल्या मतदरसंघातील समाजमनाशी नाळ जोडली गेल्यामुळे आपण आजवर केलेलं काम हीच खरी पावती.

अशी झाली राजकारणाची सुरूवात
वडील काँग्रेस कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत समाजकारणाचा वारसा मिळाला. तळागाळापर्यंत पोहोचून काम करण्याची शिकवण मिळाली.

नवएकता मित्र मंडळ स्थापन केले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणी मुळे आणि कार्यपद्धती मुळे प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. कारण एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर राजकीय पाठबळ हवेच असते. तसेच आपल्या कामाचे वर्चस्व शिवसेनेने प्रस्थापित केले होते. जे आजही टिकून आहे.

जाहिरातबाजीपेक्षा प्रत्यक्ष काम करण्याला प्राधान्य
आपले काम हीच आपली खरी ओळख असते. आपण जर काम प्रामाणिकपणे करत राहिलो तर त्याची जाहिरात करायची गरजच पडत नाहीं.

माझे आडनाव हीच माझी अडचण
कात्रज, बालाजीनगर सारख्या भागात लोकांमध्ये काम करणे सोपे नव्हते. जात पात वर्णभेद यासारख्या गोष्टीमुळे असलेल्या सामाजिक विषमतेची लाज वाटते. 

माझ्या आडनावामुळे मला असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु, कामातून आणि प्रत्यक्ष भेटीतून जाती धर्मापलिकडे मला ओळख मिळाली.

राजकारण की समाजकारण?
८०% समाजकारण आणि 20% राजकारण मानणारा पक्ष अशी शिवसेनेची शिकवण आहे. त्यामुळे समाजकारणाला अधिक महत्त्व देत हीच शिकवण आम्ही पुढे नेत काम करणार आहोत.

आरंभ :कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिसांची भूमिका समजून घ्यावी : पो. नि. हेमंत पाटील

 धाडसी कामे करताना कर्तव्यदक्ष कामगिरी बजावणारे तडफदार पोलिस ऑफिसर आणि ज्यांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले हेमंत प्रभाकर पाटील यांच्याशी विचक्षणचे प्रतिनीधी दीपक वाघ यानी बातचीत केली आणि त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीचा आढावा घेतला.  

आणि या क्षेत्राकडे वळलो....
लहानपणापासून मैदानी खेळ, फिटनेसची आवड यामुळे या पोलिस क्षेत्राविषयी एक विलक्षण आकर्षण निर्माण झाले. घरच्यांनी आणि मित्र मंडळींनी प्रोत्साहन दिले त्यामुळे आजपर्यंतचा टप्पा पार करु शकलो, असे ते पुढे म्हणाले. 

कोणत्याही क्षेत्रात उच्च पदापर्यंत जाण्यासाठी सातत्य महत्वाचे
ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम प्रचंड अभ्यास, मेहनत, शारिरिक आणि बौद्धिक विकास या सगळ्या दृष्टीने तयार व्हावे लागते. पोलिस निरिक्षकपदी रुजू होण्यासाठी प्रथमत: स्पर्धा परिक्षांना सामोरे जावे लागते. तसे कुठलेही क्षेत्र म्हणले की मेहनत करण्याला पर्याय नसतो. त्यासोबतच प्रबळ इच्छाशक्तीही असावी लागते. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी सातत्य टिकवावे लागते.  

धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी शांतता कमिटीची स्थापना 
सण उत्सव साजरा करताना कायदा पाळला गेला पाहीजे. कोणताही सण कायदा मोडून साजरा करावा असे सांगत नाही. त्यामुळे हा साजरा करताना लावावी लागणारी व्यवस्था, येणार्‍या अडचणी या सगळ्याचा विचार करुन पोलिस प्रशासनाची भूमिका लक्षात घेणे गरजेचे आहे. यासाठी शांतता कमिटीची स्थापना केली जाते आणि नागरिकांमध्ये तसेच प्रशासनामध्ये समन्वय साधण्यासाठी याची मदत होते. पोलिसांची लोकांमध्ये भीती असते पण तितकाच आदरही असतोच त्यामुळे एखादी महत्वाची कामगिरी बजावताना नागरिकांचे सहकार्य लाभते. 

गुन्हेगारी लॉंगटर्म नसते....
तरुणांनी कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारीकडे वळू नये. एखादा चुकीचा मार्ग कितीही सोपा असला तरी आपल्या भवितव्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. गुन्हेगारी लॉंगटर्म नसते पण चुकीची परिस्थिती तरुणाईला चुकीच्या मार्गाला लावू शकते. आजच्या तरूणाईला वेळेवर योग्य दिशा मिळायला हवी. जी अभ्यासातून, आजुबाजूच्या वातावरणामुळे मिळू शकते.

आरंभ :जनतेशी खर्‍या अर्थाने जोडलेले धुळ्याचे आमदार 'फारुख शाह'!

आपल्या देशाचे, आपण वास्तव्यास असलेल्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, याची जाणिव उराशी बाळगून समाजकारणाची आवड असलेले नेते, राजकारणाच्या मार्गाने वाटचाल करतात. यापैकीच एक म्हणजे, सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक आणि आता धुळ्याचे आमदार असलेले फारुख शाह!

विसाव्या वर्षी राजकारणात

फारुख शाह यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. परंतु, जनतेची किंवा समाजाची सेवा करावी अशी शिकवण त्यांच्या वडीलांनी दिली. आणि हाच तो क्षण होता, जेव्हा त्यांच्या मनात समाजकारणाचे संस्कार खर्‍या अर्थाने रुजले गेले. अगदी तरुणवयातच हळूहळू शहरामध्ये वेगवेगळ्या समस्या समजून घेण्याच्या निमित्ताने फिरायला सुरुवात केली. वयाच्या विसाव्या वर्षी निवडणुकीलाही उभे राहिले.

अल्पावधीतच धुळ्यातल्या जनतेशी जोडले 

धुळे शहराची नगरपालिका ते महानगरपालिका असा प्रवास आणि फारुखजींचा राजकीय प्रवास अगदी सोबतच झाला, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. अगदी छोटेसे गाव म्हंटले जाणारे धुळे आज शहर म्हणून ओळखले जाते. यामध्ये राहणारे अगदी दुर्लक्षित घटकही फारुख यांनी आपल्या जनसंपर्कातून जोडले. याचाच परिणाम म्हणून येथील गोरगरिब लोक, स्त्रिया, वंचित घटक अगदी हक्काने आपल्या अडचणी आमदारसाहेबांशी बोलायला येतात.

मी कुठल्या पक्षाचा?

ते कोणत्या पक्षाचे? असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले. पक्ष? मी जनतेचा...! जो नेता जनतेच्या विकासाचे काम करेल मी त्यांचा..!! 
आमदार म्हणून काम करत असताना आणि विधानपरिषदेमध्ये विरोधक म्हणूनही नसतो आणि समर्थकही नसतो. मुळातच या सगळ्याकडे केवळ राजकारण म्हणून बघतच नाही"

निधीचा विनियोग पारदर्शकरित्या

शासनाकडून मिळणारे अनुदान, निधी हा त्या त्या कामासाठीच व्हायला पाहिजे, याकडे कटाक्षाने लक्ष देतो. हा पैसा जनतेच्या सुख-सोयींसाठी मिळतो आणि ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले. त्यांच्यासाठीच हा विनियोग व्हायला हवा, असे मत त्यांनी या निमित्ताने मांडले. शहरात असलेले घाणीचे साम्राज्य,गटारी, क्रीडांगण, महिलांसाठी शौचालय, प्रसुतीगृह या सगळ्यासाठी या निधीचा विनियोग प्राधन्यक्रमाने केला जातो.

जातीवाद आणि अवैध धंदे मिटविण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न

छोटे शहर, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव म्हंटले, की काही सामाजिक समस्या डोकं वर काढतात. त्यामुळे धुळ्यातही मटका, जुगार यासारख्या गोष्टी वाढीस लागल्याचे निदर्शनास आले. यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने फारुख शाह काम करत आहेत. जातीवादाचे निमित्त होऊन जो विकास खुंटला आहे, ही परिस्थिती कमी करण्यासाठी त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. धार्मिक विविधतेला सकारत्मकतेने एकत्र बांधून धुळे शहराचा विकास साध्य करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

आरंभ :वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारणात - आ.सरोज आहिरे

नाशिक जवळ असलेले देवळाली हे एक गाव. या गावाचा मतदारसंघ विधानसभेत विशेष गाजतो तो या गावच्या आमदार सरोजताईंमुळे! या मतदार संघात त्यांनी महत्वाची विकासकामे पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवले आणि आज त्यांना त्यांचे; नव्हे त्यांच्या बाबांचे हे स्वप्न पूर्ण होताना दिसते आहे. 

राजकारणाचा वारसा!
आमदार सरोज आहिरे या स्व.बाबुलाल आहिरे यांची कन्या! वडीलही याच मतदारसंघात आमदार होते. त्यांच्या मृत्यूपश्चात आईने खंबीरपणे घराची जबाबदारी पेलली. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे येणार्‍या अनेक संकटांचा सामना करत सरोजताईंनी लहानपणापासून कष्ट करत आयुष्य व्यतीत केले.

वडलांची स्वप्नपूर्ती हीच खरी श्रद्धांजली!
मोठी झाल्यावर मी अनेक संस्थांमध्ये काम केले. अगदी अनेक बॅंका, वित्तसंस्था. राजकारणात यावे असा मानस नव्हता. परंतु, अशाच एका प्रसंगी माझ्या ऑफिसमधल्या सहकार्‍यांनी मला राजकारणात येण्याविषयी सुचवले. वडलांना जे काम करायचे होते आणि त्यांच्या निधनामुळे अपूर्ण राहिले ते काम करण्यासाठी मी राजकारणात प्रवेश केला. 

केवळ वचननामा नव्हे तर उद्दीष्टपूर्ती!
राजकारण म्हणले की, नेत्यांनी आश्वासन द्यायचे आणि मतदारांनी मत देऊन विसरून जायचे असा एक समज झाला आहे. परंतु, प्रत्यक्ष देवळाली परिसरात राहिलेली आणि फिरलेली असल्यामुळे अनेक प्रश्न समजून घेत त्यावरच काम करायचे ठरवले. मा. उपमुख्यमंत्री अजितदादा हे माझे राजकारणातील आदर्श आहे.

देवळालीतील अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडल्या
-नाशिक सहकारी साखर कारखाना
-रोजगार आणि एकलहरे विद्युतनिर्मिती केंद्र
-व्यंकटेश बालाजी देवस्थान
-देवळाली आणि जवळच्या गावातल्या स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर..

गावांना राज्याशी जोडत राज्याचा एक महत्वाचा भाग बनण्यासाठी रस्ता हा एक महत्वाचा घटक आहे. रस्ताच नसेल तर शासनाचे अनेक महत्वाचे प्रकल्प गावापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त निधी रस्ता बनवण्यासाठी आणि जोडण्यासाठी मिळवला. याचा परिणाम म्हणून दरी मातोरी, आनंदवल्ली मुंगसरा, चांदसी यासारख्या रस्त्यांचा झालेला आदर्श विकास हा अनेक नेत्यांसाठी अभ्यासाचा विषय झाला.  

कार्यसिद्धी हेच उद्दिष्ट आणि युवकांसाठी प्रेरणा!
येणार्‍या पिढीने भरपूर अभ्यास करावा. आपल्या ज्ञानामुळे हुरळून न जाता आपण करत असलेल्या अभ्यासाचा, अनुभवांचा आपल्या देशाच्या, परिसराच्या विकासासाठी उपयोग करावा. 

ज्या लोकांसाठी आपण काम करत आहोत. त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या दु:खात सहभागी व्हा, त्यांचा आनंद वाटून घ्या. त्यांना आनंद वाटून घेऊन एक आदर्श नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न करा. 

अनेक विकासकामांची भेट देवळाली मतदारसंघाला देणार्‍या आ.सरोजताई आहिरे यांच्या कारकीर्दीचा थोडक्यात घेतलेला आढावा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे देवळाली मतदारसंघासाठी जवळपास २०० कोटीपेक्षा अधिक निधी मिळवून देणार्‍या खर्‍या अर्थाने वाघीण आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

Latest News
news img

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा सोनपेठ शाखेचा अनोखा उपक्रम

news img

शिष्यवृत्ती थकविल्याने ठाणे जिल्ह्यातील शालेय शिक्षण संस्था अडचणीत

news img

केतकी चितळेच्या पोस्टवर सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

news img

धारदार शस्त्राने भोसकून पारवा येथे युवकाचा खून

news img

मध्यप्रदेश भाजपाची भोपाळमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; पंकजाताई मुंडेंची उपस्थिती

Most Viewed
news img

पिंपळवाडीत युवकाचा खून ! मित्रांनीच काढला काटा ?

news img

डिसले गुरूजींचे धक्कादायक सत्य आले समोर

news img

शिष्यवृत्तीसाठी आता अखेरचे ३ दिवस ३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत

news img

एस.टी.विना बारावी परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांचे हाल

news img

नगर शहरातील अजब रस्त्यांची गजब गोष्ट !

पिंपळवाडीत युवकाचा खून ! मित्रांनीच काढला काटा ?
पिंपळवाडीत युवकाचा खून ! मित्रांनीच काढला काटा ?
डिसले गुरूजींचे धक्कादायक सत्य आले समोर
डिसले गुरूजींचे धक्कादायक सत्य आले समोर
शिष्यवृत्तीसाठी आता अखेरचे ३ दिवस 
३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत
शिष्यवृत्तीसाठी आता अखेरचे ३ दिवस ३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत
एस.टी.विना बारावी परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांचे हाल
एस.टी.विना बारावी परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांचे हाल
नगर शहरातील अजब रस्त्यांची गजब गोष्ट !
नगर शहरातील अजब रस्त्यांची गजब गोष्ट !